सातारा : ५० hajar anudan महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेत बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. यामध्ये ४२४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर तब्बल एक कोटी ६२ लाख रुपये जमा झाले आहेत. घटस्थापनेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जमाफी योजनेत न बसलेले; पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या तीन टप्प्यात पैसे मिळाले; पण ज्यांची केवायसी व आधार प्रमाणीकरण झालेले नव्हते, त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नव्हता. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याची सूचना केली होती. ५० hajar anudan
कर्जमाफी योजनेत न बसलेले; पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या तीन टप्प्यात पैसे मिळाले; पण ज्यांची केवायसी व आधार प्रमाणीकरण झालेले नव्हते, त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नव्हता. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ४६.७० कोटी रुपये लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांच्या खात्या एक कोटी ६२ लाख रुपये वर्ग झाले आहेत.
आता जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण करून त्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक यांनी दिली आहे. ५० hajar anudan