पिक नुकसान भरपाई आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार pik nuksan bharpai

pik nuksan bharpai तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील ३७ हजार दोनशे सोळा हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती.

तालुक्यातील ५७ हजार एक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी१३ हजार सहाशे (दोन हेक्टर) रुपयेप्रमाणे ५१ कोटी रूपये अनुदान तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहे. पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन उदगीर तालुक्यातील लोहारा सर्कलमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळला असून, उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे तब्बल ५१ कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. pik nuksan bharpai

सप्टेंबर, २०२४ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध होते. त्या अनुषंगाने उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तहसीलदार राम बोरगावकर, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी पाहणी करून तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त पथकाला सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.

उदगीर तालुक्याला सरसकट अतिवृष्टीचे अनुदान देण्यासंदर्भात तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री बनसोडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तहसील व कृषी विभागाच्या वतीने याचे सर्वेक्षण करून तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास आराखडा सादर केला होता. त्यास अनुसरून उदगीर तालुक्यातील ५७ हजार एक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी१३ हजार सहाशे (दोन हेक्टर) प्रमाणे ५१ कोटी रूपये अनुदान तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहे. pik nuksan bharpai

Leave a Comment