सोयाबीन बाजारभावात २ हजार रुपयांची वाढ, भाव आणखी वाढणार का ? वाचा सविस्तर Soybean Rate

Soybean Rate : सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर मात्र खूपच दबावात आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. सोयाबीन बाजार भावात गेल्या काही दिवसांच्या काळात तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली असून यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळत आहे.

मात्र सोयाबीनचे दर अजूनही राज्यातील अनेक बाजारांमध्ये हमीभावाच्या आतच आहेत. यामुळे सरकारचा हस्तक्षेप होणे आवश्यक आहे आणि सोयाबीनला किमान हमीभाव एवढा दर मिळणे अपेक्षित आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरत आहे.

खरे तर केंद्रातील सरकारने तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी खाद्यतेल आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खाद्यतेल आयात शुल्कात वाढ झाली असल्याने आता खाद्यतेल आयात करणे महागले असून खाद्यतेलाच्या किमती वाढत आहेत आणि याचा थेट फायदा हा सोयाबीन उत्पादकांना मिळत आहे. Soybean Rate

कारण की यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने ग्राहकांना कमी दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावे खाद्यतेलाच्या किमतीत नियंत्रणात राहाव्यात या अनुषंगाने खाद्यतेल आयात शुल्क कमी केले होते. यामुळे खाद्य तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्यात मात्र याचा मोठा फटका तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनचे बाजार भाव 4 हजार रुपयांच्या खाली आले होते. हमीभाव ४८९२ रुपये प्रति क्विंटल असताना सोयाबीनचे दर चार हजार रुपयांच्या खाली आले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढत होती. संपूर्ण देशातील तेलबिया उत्पादक शेतकरी यामुळे नाराज झाले होते.

दरम्यान हीच नाराजी आणि केंद्र सरकारवर वाढत असणारा दबाव पाहता सरकारने खाद्यतेल आयाती वरील शुल्क पुन्हा एकदा वाढवले आहे. खाद्यतेल आयात शुल्क वाढवल्या बरोबर सोयाबीनचे बाजार भाव वाढलेत. सोयाबीनचे दर गेल्या काही दिवसांच्या काळात 300 ते 600 रुपयांनी कडाडले आहेत.

राज्यातील कोणत्या बाजारात सोयाबीन ला किती दर

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार एपीएमसी मध्ये 17 सप्टेंबरला झालेल्या लिलावात सोयाबीनला 4000 ते 4250 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान भाव मिळाला होता. पुढे 23 सप्टेंबर रोजी याच बाजारात सोयाबीनचे दर 4000 रुपये प्रति क्विंटल ते 4600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढलेत.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एपीएमसी मध्ये देखील सोयाबीनला 4000 ते 4455 प्रति क्विंटल असा दर मिळतोय. वाशिम एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४०११ ते 4465 असा भाव मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4160 ते 4475 असा भाव मिळाला आहे. Soybean Rate

यवतमाळ बाजार समितीत काही दिवसांपूर्वी 4,050 ते 4170 असा दर मिळत होता मात्र आता या बाजारात 4000 ते 4545 या दरम्यान भाव मिळत आहे. एकंदरीत विदर्भातील सर्वच बाजारांमध्ये सोयाबीन दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे. हा दरवाढीचा ट्रेंड नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात यामध्ये आणखी भाव वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि अजूनही राज्यातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे दर हमीभावाच्या खालीच असल्याने सरकारने हस्तक्षेप करणे जरुरी असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment