Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई ४० हजार २०० रुपये मिळू शकते. पण सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र सरकारने अजून स्पष्ट केले नाही.

आता सरकारने ट्वीट करून जिरायती म्हणजेच कोरडवाहू पिकांना किती भरपाई मिळेल हे जाहीर. केले. ट्वीटमध्ये उल्लेख आहे की ३ हेक्टरच्या मर्यादेत भरपाई मिळेल. तसेच हेक्टरी भरपाई ही नव्या निकषानुसार म्हणजेच ८ हजार ५०० रुपयांऐवजी १३ हजार ६०० रुपये भरपाई देण्यात येईल, अशी माहीती दिली.

म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान ३ हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला ४० हजार ८०० रुपये भरपाई मिळेल. जर नुकसान २ हेक्टर असेल तर भरपाई २७ हजार २०० रुपये मिळेल. एक एकर नुकसान असेल तर जवळपास साडेपाच हजार रुपये मिळतील.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात नुकसान झाले. त्याचे पंचनामे सुरु आहेत. पण या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार हा प्रश्न कायम होता. पण सरकारने कोरडवाहू पिकांसाठी भरपाईची माहीती दिली. पण सरकारने अजून याविषयी जीआर काढलेला नाही. सरकारने जीआर काढल्यानंतर बागायती पिकांचे आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईचीही माहीती मिळेल. Nuksan Bharpai 2024

पण राज्य सरकारने यापुर्वी नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या प्रचलित दरापेक्षा वाढीव भरपाई दिली होती. एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंतच भरपाई मिळते. तसेच कोरडवाहू पिकांसाठी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये आणि फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे.

पण राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये आवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी वाढीव मदत दिली होती. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी भरपाई ८ हजार ५०० रुपयांवरून १३ हजार ६०० रुपये करण्यात आली होती. बागायती पिकांसाठी १७ हजारांऐवजी २७ हजार आणि फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी ३६ हजार रुपयांची भरपाई जाहीर केली होती. त्यानुसार कोरडवाहू पिकांना भरपाई मिळेल, अशी माहीती सरकारने दिली

Leave a Comment