दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रब्बी हंगामाचा पीकविमा जमा होणार Crop Insurance

Crop Insurance जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी २४५.४१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून आतापर्यंत १२.९३ कोटी रुपये खात्यात वळती झाले आहेत. उर्वरित ११२.२९ कोटी रुपये नुकसान भरपाई पुढील एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे विमा कंपनीने लेखी कळवले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. रब्बी २०२३-२४ या हंगामासाठी एक लाख ३५ हजार ५५१ शेतकऱ्यांना २४५ कोटी ४१ लाख रुपये भरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी ९२८२ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लाख रुपये नुकसान भरपाई वितरित झाली आहे. आता ४७ हजार ७०७ शेतकऱ्यांना ११२.२९ कोटी नुकसान भरपाई मागील आठवड्यातच मंजूर झाली असून रविवारी (ता. २२) ही रक्कम एनसीआयपी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. Crop Insurance

पुढील एक-दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एकूण प्रीमियम रकमेच्या ११० टक्के नुकसान भरपाई वितरित केली असून, उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जाईल, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

खरिपासाठी १३८ कोटी वितरण

गेल्या वर्षातील खरीप हंगामासाठी पीकविमा कंपनीने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन लाख ९५ हजार ३१३ शेतकऱ्यांना २५२.१५ कोटी रुपये भरपाई मंजूर केली होती. त्यापैकी २ लाख २४ हजार ४८२ शेतकऱ्यांना १३८ कोटी ५१ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यात आले आहेत. Crop Insurance

प्रीमियम रकमेच्या ११० टक्के भरपाई कंपनीने वितरित केली असून उर्वरित रक्कम पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे, असे कंपनीने कळवल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांनी दिली.

Leave a Comment