खरिप व रब्बी पिकांचा ४९८ कोटी पीकविमा मंजूर, २६४ कोटींचे वाटप Allotment of crop insurance

Allotment of crop insurance प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप व रब्बी हंगाम सन २३-२४ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४९७.९३ कोटी विमा रक्कम मंजूर झाली होती. पैकी २६४.०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईपोटी जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम २३३.८३ कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आली असून, सदर रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप, रब्बी हंगाम सन २३-२४ अंतर्गत अनुक्रमे २५२. ५१ कोटी व २४५.४२ कोटी असे एकूण ४९७.९३ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. मंजूर नुकसान भरभाईपैकी पीकविमा कंपनीने खरीप हंगामातील १३८.५१ कोटी व रब्बी हंगामातील १२५.२३ कोटी असे एकूण २६४.०७ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरण केली आहे. विमा कंपनीच्या तरतुदी प्रमाणे कंपनीने एकूण प्रीमियमच्या ११० टक्के नुकसान भरपाई वितरित केली असून, उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात २३३.८३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने शासनाकडे सदर निधीची मागणी केली आहे. सदर निधी प्राप्त होताच प्रलंबित नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. खरीप हंगाम २५-२५ अंतर्गत तक्रार केलेल्या पीकविमाधारक शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे सुरू असून, पंचनामे करताना पैशाची मागणी केल्यास तात्काळ लेखी तक्रार कृषी विभागाकडे करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच २० ते २२ ऑक्टोबर या कालावधी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची तक्रार संबंधित कंपनीकडे करावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. Allotment of crop insurance

Leave a Comment