या ६ जिल्ह्याची प्रलंबित विमा भरपाई मंजूर, जिल्ह्याची यादी पहा Pending Insurance

Pending  Insurance राज्यातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप-२०२३ मधील पीक विम्याचे प्रलंबित १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत. यात

  • नाशिक,
  • जळगाव,
  • नगर,
  • सोलापूर,
  • सातारा
  • चंद्रपूर

या जिल्ह्यांचा समावेश आहे. ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

राज्यात पीकविमा योजनेसाठी ‘बीड पॅटर्न’ रबविण्यात येत आहे. बीड पॅटर्ननुसार  विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त आल्यास ११० टक्क्यांपर्यंत विमा भरपाई विमा कंपनी देते, तर त्यापुढची भरपाई राज्य शासन देते. ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई यंदा ११० टक्क्यांपेक्षा जास्त आली होती. Pending Insurance

ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या २०० ते ३०० टक्क्यांपर्यंत आली होती. त्यामुळे विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा पुढची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी या विमा कंपनीने केली होती. ओरिएंटल विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी एकूण १ हजार २५५ कोटी रुपये मिळाले होते. पण या कंपनीकडे विमा भरपाईची रक्कम ३ हजार ३०७ कोटी रुपये आली होती. विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांप्रमाणे विमा कंपनीकडे भरपाईची रक्कम १ हजार ३८० कोटी रुपये आली होती. तर ११० टक्क्यांपेक्षा पुढची सरकारकडे १ हजार ९२७ कोटी रुपये भरपाई आली होती.

कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे १ हजार ९२७ कोटी रुपयांची मागणी केली होती. आता राज्य सरकारने ही रक्कम विमा कंपनीला दिली आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

खरिपातील विमा भरपाई

मागील हंगामात दुष्काळी परिस्थिती असल्याने पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे खरीप हंगाम २०२३ मध्ये विक्रमी विमा भरपाई मिळाली. शेतकऱ्यांना एकूण ७ हजार ६२१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी विमा कंपन्यांनी आतापर्यंत ५ हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता आणखी १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत.

जिल्हानिहाय मंजूर भरपाई

सरकारने सहा जिल्ह्यांसाठी १ हजार ९२७ कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे.

यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ६५६ कोटी रुपये,

जळगाव जिल्ह्यात ४७० कोटी रुपये कोटी, नगर जिल्ह्यात ७१३,

सोलापूर जिल्ह्यात २.६६ कोटी, सातारा जिल्ह्यात २७.७३ कोटी

चंद्रपूर जिल्ह्यात ५८.९० कोटी रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे.

Leave a Comment