हेक्टरी 25 हजार : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झालेत. सोयाबीन कापूस धान आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी मोठी घातक ठरली.
यामुळे आता महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावध पावले टाकत शेतकऱ्यांना साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांना देखील खुश करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना अर्थातच लाडका भाऊ योजना यांसारख्या अनेक योजना शिंदे सरकारने जाहीर केल्या आहेत.
अशातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. फडणवीस यांनी राज्यातील विदर्भ आणि कोकणातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मोठी घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या पाच वर्षापर्यंत कुठल्याही शेतकर्याला कृषी पंपाचे विज बिल भरायचे नसून उपसा सिंचन योजनेला सुध्दा त्याकरीता आम्ही आधीच निधी दिला आहे असे सांगितले आहे.
तसेच, दान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांचा बोनस दिला जाईल असे फडणवीस यांनी म्हटले आहे. खरे तर धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी बोनस दिला जातो. यानुसार यंदाही धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे.
यावर्षी २५ हजार रुपयाचा बोनस देण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडून मंजूर करवून घेतो अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
धापेवाडा योजनेच्या टप्पा २ व ३ चे भुमिपूजन आणि दुरुस्त झालेल्या वितरिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले असून याच लोकार्पण सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.